Friday, November 8, 2019

Proud moment for PVPCOA

जाई जुईचा गंध मातीला...

प्राध्यापक मीनल सगरे मॅडम यांना मनःपूर्वक धन्यवाद
*तिथक्षेञ दक्षिण काशी संगम माहुली*
*तिर्थक्षेत्र संगम माहूली गावातील मंदिरे व घाट तसेच नदीच्या संगमाची माहिती अमेरिकेत पोहचवली संगम माहूली गावातील पर्यटन वाढीसाठी मोलाचे सहकार्य केल्या बद्दल प्राध्यापक मिनल सगरे मॅडम प्रा. VIT,s P. V. P. College Of Architecture Pune. याचे संगम माहूली ग्रामपंचायत व सर्व ग्रामस्थ याच्या वतीने अभिनंदन*
*संगम माहूली गावातील सर्व मंदिरांची माहिती व ऐतिहासिक समाधींची माहिती एकत्र करून ती सातासमुद्रापार पोहचवली व एक चांगला प्रकल्प अमेरिकेत सादरीकरण करून संगम माहूली गावाचे नाव गौरवण्यात आले*.
पुणे स्थित अर्किटेक्चर आणि अर्बन डिझायनर *प्राध्यापक मिनल सगरे मॅडम* हया गेले पाच वर्षे साताऱ्याजवळील संगम माहूली येथील संगमावरील मंदिराचा व घाटाचा अभ्यास करीत आहेत. संगम तिथक्षेत्रांची रचना त्याची निर्मिती त्याचा विस्तार आणि ह्या सर्वामध्ये वास्तुकलेची भूमिका यांचे ऐतिहासिक आणि वास्तुशास्त्रीय दृष्टीकोनातून अभ्यास करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. या प्रकल्पासाठी संगम माहूली व क्षेत्र माहूली येथील संगम तिर्थक्षेत्र हे अतिशय उत्तम आणि महत्त्वाचे उदाहरण आहे या प्रकल्पा दरम्यान त्यानी कृष्णा वेण्णा नदीवरील सर्व संगमाचा अभ्यास केला आहे. तसेच भारतातील महत्त्वाच्या नद्यांवरील महत्त्वाच्या संगमांचादेखील आढावा घेतला आहे. या अभ्यासावर आधारित लेख त्यानी अमेरिकेत मॅडिसन या शहरामध्ये नुकत्याच पार पडलेल्या 48 व्या साऊथ एशिया आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रस्तुत केला. *The Sacred Landscape of River Confluences The Case Of Sangam Mahuli India"* असे या लेखाचे नाव होते. *आंतरराष्ट्रीय परिषद दरवर्षी मॅडिसन विस्काॅनसीन विद्यापीठातील साऊथ एशिया सेंटर तर्फे भरविली जाते. या वर्षे 17 ते 20 आॅक्टोबर 2019 ला परिषदेला जगभरातून आलेले दक्षिण एशियावर अभ्यास करणारे इतिहास, कला, पुरातत्वशास्त्र, समाजशास्त्र, वास्तुकला, अशा विविध क्षेत्रात संशोधन करणारे संशोधक उपस्थित होते*. या आधी देखील या अभ्यासावर आधारित लेख त्यानी गेल्या वर्षी आॅक्टोबर महिन्यात अयोध्या फैजाबाद येथे भरविलेल्या " *Pilgrimage Cities And Cuttural Landscape Of Asia and Prospects For Sllstainab Tourism* " या आंतरराष्ट्रीय संमेलनात प्रस्तुत केला होता. ही परिषद एशियन कल्चरल लँडस्केप असोसिएशन तर्फे भरविण्यात आली होती. *"The Patterns in Imagination Representation and Architecture Manifestation Of Sangams in India"* हे प्रस्तुत केलेल्या लेखाचे नाव होते. या शोध प्रकल्पाची सुरवात "महाराष्ट्र असोसिएशन आॅफ स्कूल् आॅफ अर्किटेकचर (MASA) या संस्थेच्या रिसर्च फेलोशिप अंतर्गत 2014 मध्ये झाली होती. या संशोधना दरम्यान दोन्ही गावातील ( *संगम माहूली व क्षेत्र माहूली*) स्थानिकांचा उस्फूर्त सहभाग लाभला. विशेषतः *संगम माहूली गावातील ग्रामपंचायत सदस्य श्री प्रकाश माने व श्री विक्रांत कुलकर्णी व श्री बाळूकाका ताटके तसेच क्षेत्र माहूली गावातील श्री भगवान आफळे* यांनी या संशोधना दरम्यान मोलाची मदत केली *धन्यवाद*










1 comment:

  1. Great information.






    -------------------------------------------------
    I work in Stabilit America frp panels

    ReplyDelete